Marathi

Bhonsala Military College    14-Jul-2020
Total Views |
  DEPARTMENT OF MARATHI
 

Name of Department                                 :             Marathi

 
Year of Establishment                                   :              1989
 
Names of Courses Offered                         :              FYBA,SYBA,TYBA,FYBCOM
 
Eligibility  for UG & PG                                   :         Marathi Subject is available as General Subject for B.A ,B.Com Streams.
 

Activities: 

मराठी विभाग आयोजित २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाविद्यालयात साजरा झाला.सुरुवातीला आदरणीय प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांच्याहस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन झाले व नंतर सेमिनार हॉलमध्ये पुढील कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक हिरा वाघ यांनी केले. त्यानंतर आरती शिरवाडकर व शुभांगी बल्लाळ या दोन विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषेविषयीचा आदर व्यक्त केला. त्यानंतर आदरणीय प्राचार्यांनी मराठी भाषेची महती कथन करत संत ज्ञानेश्वरांच्या पसायनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच मराठी भाषेविषयी असणारी जागरूकता कशी असावी हे समजावून सांगत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नंतर उज्वला कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदंडी सारंग ताजणे या विद्यार्थ्याने केले.
 
marathi_activities 
वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभागातर्फे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत आपल्या महाविद्यालयात दिनांक 30 जानेवारी 2023 व 31 जानेवारी 2023 या दिवशी निबंध लेखन ,घोषवाक्य लेखन ,मराठी कथा अभिवाचन या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांसाठी परीक्षा चालू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या तीनही स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी
 सहभाग घेतला.
 
Marathi Activity
 
 
Teaching staff: 

H.T. Wagh
     Dr.H.T.Wagh
     M.A.,B.Ed,SET,Ph.D. 
     Assistant professor
     Experience: 10 Years