
भोसला स्टाफ अकॅडमीचे द्वितीय पुष्प दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या सत्राचा विषय “Dieting: Conceptions and Misconceptions” असा होता. या विषयावर मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. प्रभावती जगताप यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या दैनंदिन जीवनात ‘डायटिंग’विषयी अनेक समज-गैरसमज आढळतात. वजन कमी करण्यासाठी आहार कमी करणे, विशिष्ट पदार्थ पूर्णपणे टाळणे, क्रॅश डायटिंग करणे किंवा सोशल मीडियावरून मिळणाऱ्या अपुऱ्या माहितीच्या आधारे आहाराचे नियोजन करणे अशा विविध गैरसमजांवर व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात आला.
योग्य आणि संतुलित आहार, आहाराचे प्रमाण व गुणवत्ता, नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली तसेच आहाराकडे वैज्ञानिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व याविषयी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. ‘डायटिंग’ म्हणजे केवळ अन्नाचे प्रमाण कमी करणे नसून, आपल्या शरीराच्या गरजेनुसार योग्य आहाराची निवड आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या सत्रातून देण्यात आला.
मार्गदर्शनानंतर विषयावर मुक्त चर्चा आयोजित करण्यात आली. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न मांडले व वक्त्यांशी संवाद साधला.
एकूणच, आरोग्य, आहार आणि जीवनशैलीकडे अधिक जागरूक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारे हे सत्र अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरले.