आंतरराष्ट्रीय युवा दिन

Bhonsala Military College    23-Sep-2026
Total Views |
"भोंसला महाविद्यालयात १२ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन जल्लोष्यात साजरा"
 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NSS परिपत्रकानुसार १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट "स्वच्छता पंधरवडा"साजरा केला जात आहे. या परिपत्रकानुसार १२ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला . या निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम राबविले .
 
 
• स्वछता अभियान - स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी कॉलेज च्या कॅम्पस मध्ये स्वछता अभियान अभियान राबविले यामध्ये NSS स्वयंसेवक तसेच इतर विद्यार्थी सहभागी होते.
 
 

• राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयIचे उदघाट्न - आज पासून NSS चे कामकाज पेरेंट्स लौन्ज येथून ऑफिस माध्यमातून होणार आहे. या ऑफिस चे उदघाट्न प्रोफेसर डॉ. सुनील जोशी यांनी रिबीन कापून तर NSS Program Officer डॉ. मिलिंद पाडेवार यांनी नारळ फोडून केले. यावेळी डॉ.वी.पी पवार, डॉ.भारत गुगाने, डॉ. रमेश राऊत,प्रा.चेतन पवार,प्रा. श्रीकृष्ण कुलकर्णी, सब लेफ्टनंट दत्ता निंबाळकर, क्रीडा संचालक केतन जाधव,प्रा. किरण शेंडे, प्रा. ऋषीकेश झुटे, Program Officer मोनाली हIसे व अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
 
 

• युवकांसाठी विशेष व्याख्यान - आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करतांना युवक म्हणजे नेमक कोण देशाच्या विकासात युवकांची भूमिका, त्यांचे अधिकार, तसेच आजची झेन जी डॉ.वी.पी पवार यांनी या सर्वांवर मार्गदर्शन केले. तसेच "व्यसनमुक्त युवा" कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले.
 
 
• थॅलेसेमिया मुक्त नाशिक जनजागृती व तपासणी शिबीर - संस्थेकडून आलेल्या पत्रानुसार नाशिक जलकल्याण ब्लड बँकेतर्फे " थॅलेसेमिया मुक्त नाशिक जनजागृती व तपासणी शिबीर" कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रोफेसर डॉ.सुनील जोशी यांनी ब्लड बँकेच्या संचालिका एकबोटे मॅडम यांचा सत्कार करत स्वागत केले तर प्रोफेसर डॉ. भारत गुगाने सर यांनी प्रदीप ढोले यांचा सत्कार करत स्वागत केले.एकबोटे मॅडम यांनी थॅलेसेमिया या अनुवांशिक आजाराबद्दल तसेच टीबी विषयी सविस्तर अशी माहिती देत जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी २३४ NCC व NSS चे स्वयंसेवक उपस्थित होते.तर कॅप्टन योगेश भदाणे, मैथिली दते,प्रियंका गावित उपस्थित होते.थॅलेसेमिया तपासणीत विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०४ जणांनी रक्त तपासणी केली. या सर्वांचे रिपोर्ट कॉलेज ला देणार आहेत.
 
 
वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते, तर प्राचार्य डॉ.आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्स्फूर्तपणे साजरा झाला.
 
 

nss-1 
 
 

nss-2