भारतीय संस्कृती परिक्षा

Bhonsala Military College    19-Nov-2020
Total Views |
 
 सस्नेह नमस्कार.
"मनुष्य निर्माण व राष्ट्र पुनरुत्थान" हे ब्रीद घेऊन, विवेकानंद केंद्र देशभर 85 शाळा आणि 1015 शाखांच्या माध्यमातून कार्यरत आहे.
"घडा आणि घडवा" हा विवेकानंदांचा विचार समोर ठेवून केंद्राच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे "भारतीय संस्कृती परिचय" हा महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी एक महत्वाकांक्षी अभिनव उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.
युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग सातत्याने होत आला आहे. सदर उपक्रमात सहभागी असणारे अनेक युवक समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. युवकांना सकारात्मक दिशा मिळून त्यांचे सर्वांगीण विकसन होण्यासाठी हा उपक्रम आहे.

प्रत्येक सहभागी विद्यार्थी व महाविद्यालयाला विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत मार्फत उपक्रम यशस्वितेचे प्रमाण पत्र दिले जाणार आहे.
सध्याची स्थिती पाहून यावर्षी या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे परीक्षा ऑनलाईन होणार आहे.

यावर्षी हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत खुल्या गटासाठी सुद्धा घेतला जात आहे.
तरी सदर उपक्रमाची माहिती आपल्या महाविद्यालयातील अधिकाधिक युवक-युवतींना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्यावी.

ऑनलाईन नोंदणी करण्यास आपल्या स्तरावर प्रेरीत करावे ही विनंती.
युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या उपक्रमात आपले सर्वतोपरी सहकार्य मिळेल असा विश्वास आहे.
सोबत परीक्षेचे पत्रक जोडले आहे.

आपला विश्वासू

अभय बापट
प्रांत प्रमुख
महाराष्ट्र व गोवा
 
 
Click Here-  http://mh.vkendra.org/ 
 
टीप : नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे 
 

bhartiya Sanskruti Pariks                                        
bhartiya Sanskruti Pariks