Volunteers for a social cause

Bhonsala Military College    27-Mar-2020
Total Views |
नमस्कार,

२१ दिवसाच्या नाशिक शहरातील लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर शहरात येत्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक गोष्टीत मदत करू इच्छिणारे अशा भोसला परिवाराशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांची यादी आपण तयार करत आहोत. अशा नावे आपण स्वयंसेवी संस्था आणि शासन यंत्रणेला कळवू शकलो तर त्याचा योग्य नियोजनासाठी निश्चित उपयोग होईल. या कठीण प्रसंगात आपण समाज म्हणून सगळेजण एकमेकांच्या सोबत आहोत. आपल्या ज्ञानाचा, गुणवत्तेचा उपयोग या कठीण काळात देशहितासाठी नक्की होईल. आपण ज्या भागात राहत आहात त्या भागाचे गुगल लोकेशन आपल्या नावाने (सेव्ह) जतन करावे करावे. खाली लिंक दिली आहे. फॉर्म भरल्यानंतर लोकेशन जतन करावे. भोसला परिवार म्हणून या कामास आपण हातभार लावायचे ठरवले आहे तरी सर्वानी सहकार्य करावे ही विनंती. भोसला परिवार

https://forms.gle/3nzr6exm3hZxKvQ99 
 
 
अत्यंत महत्त्वाचे स्वयंसेवक निवडीचे निकष
 
👉कोरोना संसर्ग आपत्तीमध्ये आपण केवळ आणि केवळ प्रशिक्षित स्वयंसेवकानाच काम देणे अपेक्षित आहे.
👉 खालील निकष लागू आहेत.
👉मदत कार्यात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांची निवड खालील मुद्यांच्या आधारे डॉक्टर ने मुलाखत घेऊन करायची आहे.
👉प्रत्यक्ष अथवा फोनवर मुलाखत पूर्ण करूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काम द्यावे.

स्वयंसेवक निवडीसाठी निकष
१) वय १८-५५ वर्ष असावे.
२) गेल्या ३ महीन्यात कुठलाही विदेश प्रवास झालेले किंवा विदेशातून परत आले नसावेत.
३) गेल्या ५ महीन्यात कुठलेही आॅपरेशन, हाॅस्पीटल भरती झालेली नसावी.
४)अस्थमा, सर्दी, पडसे, खोकला, दमा, श्वसनाचा त्रास नसावा.
५) यापूर्वी बायपास / अँजिओ सर्जरी, आॅर्गन‌ ट्रांसप्लांट झालेली नसावी.
६) मधुमेह, उच्च रक्तदाब नसावा.
७) कोरोना या गंभीर साथीमुळे काय परीणाम होऊ शकतात ह्याची कल्पना स्वयंसेवकास असली पाहिजे.
८) परीवारातील सदस्यांना या सेवा कार्यात स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करीत आहोत ह्याची कल्पना देणे आवश्यक आहे.
९) मानसिक दृष्ट्या कोणत्याही व्याधी नसाव्यात.
१०) कोरोना व्हायरस संदर्भात स्वत:ची,कुटुंबाची, काय काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.
११) घरातील कोणाला, नातेवाईकाला किंवा मित्रमंडळीला संसर्ग झालेला नसावा.
१२) काही ईमरजंसी आल्यास घरातील कोणत्या नातेवाईकांशी संपर्क करावा.
१३) मदत कार्यात काम करणाऱ्या स्वयंसेवाकचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.