करिअर कट्टा

Bhonsala Military College    10-Dec-2021
Total Views |
 
          करिअर कट्टा
 
 
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. या उक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा (UPSC) आणि व्यवसायातील संधी या बाबत या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन करतात. यात IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, कौशल्य विकास, placement आणि यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. करिअर कट्ट्याची सगळी माहिती विद्यार्थ्यांना देता यावी या उद्देशाने दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन करिअर कट्टा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी नोंदवावा.
सदर उपक्रमांमध्ये यूट्यूब चैनलद्वारे सहभागी होता येईल. यूट्यूब चैनलची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
 
                                 https://youtube.com/c/uvajagar 
 
दिनांक 13 डिसेंबर 2021 पूर्वी विद्यार्थ्यांनी सदर चैनल सबस्क्राईब करून आपले नाव महाविद्यालयाचे नाव हे कमेंट करावे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
आधिक माहितीसाठी या उपक्रमाचे समन्वयक डॉ. सुभाष सावंत ( रूम न. 35, mob. 7588649683) यांच्याशी संपर्क साधावा.
प्राचार्य
भोसला मिलटरी कॉलेज नाशिक.