ज्ञानेश्वरी निरुपणकार पद्माकर देशपांडे यांच्या स्वबोध ज्ञानेश्वरीतून......
	
	
		Bhonsala Military College    02-Dec-2021
		
	
	
	    Total Views | 
	
	
	
		  
 
संत ज्ञानेश्वर......१३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्वज्ञ म्हणूनही ते परिचित होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांबरोबरच विद्यार्थी.शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी अशा सर्वांनाच हे विचार ऐकायला मिळावे,आध्यात्मिक प्रेरणा मिळावी. जीवनासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या याच ग्रंथातील विविध बाबींचे सारं ऐकूया ज्येष्ठ पत्रकार व स्वबोध ज्ञानेश्वरी निरुपणकार पद्माकर देशपांडे यांच्या स्वबोध ज्ञानेश्वरीतून......