लोकमत सखी सन्मान पुरस्कारानं रामदंडीचा गौरव..

10 May 2022 10:00:36
नाशिक- सोमेश्वर येथे रोडरोमिओंना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या भोसला मिलीटरी कॉलेजमधील रामदंडीना आज विभागस्तरीय लोकमत सखी सन्मान पुरस्कारानं गौरविण्यात आले. कालीदास कलामंदीरात  हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रातिनिधीक स्वरूपात वैष्णवी कल्याणकर हिने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह,भेटवस्तू,प्रमाणपत्राचा स्विकार केला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, सुदर्शन हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय धुर्जड,लोकमतचे महाव्यवस्थापक बी.बी.चांडक आदी उपस्थित होते. लोकमत सखी मंच हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महिलांसाठीचे हक्कांचे व्यासपीठ आहे.
 

sanmman 
Powered By Sangraha 9.0