15/8/22 -भोसला मिलीटरी कॉलेजमध्ये स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले.

25 Aug 2022 09:12:30
 
भोसला मिलीटरी कॉलेजमध्ये स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी महाविद्यालयाचे कॅटो कर्नल राम नायर,प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी,कॅम्पस को-ऑर्डिनेटर डॉ.संजय कंकरेज.प्रा.डॉ.विवेक राजे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. सहभागी शिक्षक,प्राध्यापक,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.बेलगांवकर म्हणाले, यंदाचा स्वातंत्र्यमहोत्सव आगळावेगळा असून अमृतमहोत्सवी हे वर्षे सर्वांच्याच कामय स्मरणात राहिल. आपला भारत देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे. याला शैक्षणिक क्षेत्रही सुध्दा अपवाद नाही, विद्यार्थी विविध क्षेत्र पादाक्रांत करत आपली वाटचाल करतांना दिसत असून ही आनंददायी बाब आहे. विद्यार्थीनी व्यक्तीमत्वाचा विकास करण्याबरोबरच सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून देशसेवेसाठी तत्पर राहावे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष कामगिरी बजावणाऱ्या एनसीसीच्या मुला-मुलींचा डॉ.बेलगांवकर यांच्याहस्ते रँक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने कॉलेज परिसरात तिरंगा,रांगोळी,फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मेजर विक्रांत कावळे, कॅप्टन योगेश भदाणे,.प्रा.दत्ता निंबाळकर आदींनी कार्यक्रमांसाठी समन्वय ठेवला, स्नेहल निकम यांनी सुत्रसंचालन केले. 
 
 

Flag Hoisting
Powered By Sangraha 9.0