19/8/22 -यंदा महाविद्यालयात दही हंडी उत्सव बोर्डर विद्यार्थ्यां मार्फत वक्तशीर, शिस्तबध्द आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला..!

25 Aug 2022 08:55:13

यंदा महाविद्यालयात दही हंडी उत्सव बोर्डर विद्यार्थ्यां मार्फत वक्तशीर, शिस्तबध्द आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला..!!
ठीक चार वाजता कोदऺडधारी श्रीराम मंदिर येथे बुवा गुरुजी यांच्यामार्फत गोपाळकाला व दहीहंडी याचे महत्त्व समजून घेऊन व पाळण्यावर आरती करून दहीहंडी उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
परेड मैदान येथे विद्यार्थी जमल्यानंतर आयोजनाचे समन्वयक क्रीडा संचालक निरंजन गायकवाड यांनी दहीहंडी योग्य पद्धतीने करण्यासाठी व दुखापत होऊ नये यासाठी सूचना दिल्या.
महाविद्यालयाचे कॅटो, कार्यालय अधीक्षक, उप प्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उत्साहात एकाच ठिकाणी तीन १) ११ वी (ज्युनिअर भवन)
२) गर्ल्स भवन ३) १२ वी ते T.Y (सीनिअर भवन) दहीहंडी लागोपाठ कुठलीही दुखापत न होता फोडण्यात आल्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे अगदी कमी कालावधीच्या सरावात विद्यार्थ्यांनी सांघिक दृष्ट्या दही हंडीचा फोडण्याचा उत्कृष्ट असा नमुना सादर केला.
विद्यार्थिनींनी एकाच प्रयत्नात फोडलेली दहीहंडी मन वेधून घेणारी ठरली.
सदरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन नवनियुक्त रँक होल्डर व सर्व विद्यार्थी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.
उत्सवाच्या शेवटी घोषणा देत व कनिष्ठ महाविद्यालयाच्या काही शिक्षकांनी केलेल्या गोपाळकाला प्रसाद वाटप करून करण्यात आले.
सदरील उत्सवास मा. प्राचार्य, कॅम्पस कॉर्डिनेटर, क्रीडा संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 
  Dahihandi

         Dahihandi
 


Powered By Sangraha 9.0