`मेरी माटी मेरा देश` अभियान

Bhonsala Military College    19-Oct-2023
Total Views |
 
 
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रमात बोलतांना राज्य समन्वयक राजेश पांडे शेजारी संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, डॉ.विजयप्रसाद अवस्थी,संजय चाकणे,सिनेट सदस्य सागर वैद्य,विजय सोनवणे, श्रीराम झाडे आदी


`मेरी माटी मेरा देश` अभियानाचा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी हवे सामुदायिक योगदान
राजेश पांडे यांची अपेक्षाः `सीएचएमईएस`च्या कार्यक्रमांत घेतला उत्तर महाराष्ट्राचा आढावा
नाशिकः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मेरी माटी मेरी देश या उपक्रमात स्वातंत्र्यपुर्व काळात त्याग केलेल्या लोकांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा एक उद्देश आहे. हेच लक्षात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रत्येक व्यक्ती,कुटूंबाने यात योगदान देऊन माती सोबत सेल्फी काढावे, हे अभियान सामुदायिक व्हावे,अशी अपेक्षा अभियानाचे राज्य समन्यक राजेश पांडे यांनी व्यक्त करत. या अभियनाद्वारे जवळपास एक कोटीचे उद्दिष्ट ठेवले असून ते नक्कीच साकार होईल, यातून आपला विश्वविक्रम नोंदवला जाईल असेही त्यांनी सांगितले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठद्वारा आयोजित `मेरी माटी मेरा देश` या अभियानात श्री.पांडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठाव संस्थेचे कोषाध्यक्ष राहुल वैद्य, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य संजय चाकणे,कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रसाद अवस्थी, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक,सिनेट सदस्य विजय सोनवणे,सागर वैद्य,मुंजे इन्टीट्युटचे उपसंचालक श्रीराम झाडे आदी उपस्थित होते..
सुरवातीला चाकणे यांनी या अभियानाची पार्श्वभूमी सांगत महाराष्ट्रात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर श्री.पांडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,महात्मा गांधीनी चरख्यांद्वारे स्वदेशीची तर मिठाच्या सत्याग्राहाद्वारे मिठाची चळवळ,अभियान चालवले. त्यास सामाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. मेरी माटी मेरा देश हे सुध्दा असेच वेगळे अभियान आहे. आपण प्रत्येकाने त्यात पुढाकार घेतलाच पाहिजे. स्वातंत्र्यकाळात या मातीने खूप शूरवीर,स्वातंत्र्यवीर देशाला दिले, त्याचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही त्यामुळेच माती हातात घेऊन नमन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. केवळ मातीच घेऊ नये तर त्याजोडीला सेल्फी घेऊन तो फोटो अपलोड करत खारीचा वाटा उचलावा असे नमूद केले..
अमृतवाटिकेत मिळणार स्थान
१४० कोटीची विविध भागातून येणारी ही माती ३१ तारखेपर्यत दिली नेण्यात येईल,तेथे दुपारी पंतप्रधानाच्या उपस्थितीत अमृतवाटिकेत कार्यक्रम होऊन त्या वाटिकेत या मातीचा वापर होईल,असे नमूद करून ते म्हणाले. या अभियानाच्या निमित्ताने मी राज्यात दौरा करत असून शाळा,महाविद्यालय,सामाजिक संस्थां अशा सर्वांकडूनच चांगला प्रतिसाद मिळत असून एक कोटीचे उद्दिष्ट आम्ही साकार करू यात शंका नाही. सीएमए देशपांडे यांनी या अनोख्या अभियानात संस्थेचे सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक त्यांचे कूटूंब सहभागी होऊन नक्कीच योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी शिरीषकुमार, चाफेकर बंधू,राजगूरू यांची उदाहरे दिली. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संलग्न समितीवर श्री.पांडे व चाकणे यांची निवड झाली असे निबंधक व्ही.पी.पाटील यांनी सांगत या दोघांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.प्रा.स्नेहा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले,राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.