दसऱ्यानिमित्त भोसला मिलिटरी कॉलेजच्या रणगाड्याजवळ शस्त्र व अश्वपूजन करण्याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे,कोषाध्यक्ष राहुल वैद्य, माजी सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर,कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रसाद अवस्थी, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक आदी

दसऱ्यानिमित्त भोसला मिलिटरी कॉलेजच्या रणगाड्याजवळ शस्त्र व अश्वपूजन

Bhonsala Military College    25-Oct-2023
Total Views |

 

दसऱ्यानिमित्त भोसला मिलिटरी कॉलेजच्या रणगाड्याजवळ शस्त्र व अश्वपूजन
 
 
भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आज विजयादशमीनिमित्त शस्त्र व अश्वपूजन करण्यात आले. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे,सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे,कोषाध्यक्ष राहुल वैद्य, माजी सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर,कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रसाद अवस्थी यांच्याहस्ते विविध शस्त्र व अश्वांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी सर्वांचे तुलशीचे रोप देऊन स्वागत केले. अँड.भिडे यांनी विजयादशमीचे महत्व सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री.देशपांडे यांनीही सर्वांना शुभेच्छा देत संस्थेने जयरामपूर(अरूणाचल प्रदेश) येथे डॉ.मुंजे आर्म फोर्सेस प्रशिक्षण केंद्र सुरु केले असल्याचे सांगत तेथील मुलांना प्रशिक्षणासाठी भोसला कॉलेजचे शिक्षक जाणार आहे असे नमूद केले. स्नेहा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. नाईक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.