नवीन मतदार जनजागृती बॅनरचे अनावरण

Bhonsala Military College    07-Dec-2023
Total Views |
नवीन मतदार जनजागृती
 
नवीन मतदार जनजागृती बॅनरचे अनावरण
 
भोसला मिलीटरी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर नवीन मतदार जनजागृती बॅनरचे अनावरण प्रसंगी प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.भारत गुगाणे,डॉ.रमेश राऊत,प्रा.चित्तरंजन पवार, प्रा.भिमराव पांडवे,मयुरेश निकम आदी 


जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नाशिक आयोजित मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत नवीन मतदार जनजागृती बॅनरचे आज भोसला मिलीटरी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. नवीन मतदार नोंदणीसाठी हा विशेष जनजागृती कार्यक्रम होत आहे. यावेळी महाविद्यालयाच्या आयक्यूएससी विभागाचे प्रमुख डॉ.भारत गुगाणे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. रमेश राऊत, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. चित्तरंजन पवार, महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंडळ नोडल अधिकारी प्रा. भीमराव पांडवे, महाविद्यालयीन निवडणूक साक्षरता मंडळ विद्यार्थी सदिच्छा दूत मयुरेश निकम आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.नाईक यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी नोंदणीच्या अहवालाची सविस्तर माहिती देण्यात आली.