शिक्षणतज्ञ डॉ.आनंद म्हापुसकर यांचे महाविद्यालयातील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एनईपी) २०२० या विषयांवर व्याख्यान .

Bhonsala Military College    28-Feb-2023
Total Views |
 मुंबई येथील सृजन कन्सलंटट संस्थेचे संस्थापक,शिक्षणतज्ञ डॉ.आनंद म्हापुसकर यांचे आज महाविद्यालयातील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एनईपी) २०२० या विषयांवर व्याख्यान झाले. संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगांवकर,नाशिक विभागाचे सहकार्यवाह नितीन गर्गे,प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, आयक्युएसीचे विभागप्रमुख डॉ.भारत गुगाणे हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. एनईपी चा आढावा सादर करतांना डॉ.म्हापुसकर यांनी विविध उदाहरणे देत महत्व पटवून दिले. या नव्या शैक्षणिक धोरणामुळे अध्ययन,अध्यापन पध्दती बदलण्याबरोबरच विद्यार्थी,समाजाशी अधिक जवळीक साधण्यास मदत होणार आहे. केवळ पुस्तकरूपी शिक्षण न राहता विद्यार्थींना सर्वच बाबतीत पारंगत तसेच कौशल्याधिष्ठीत बनविण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक धोरणात १८३५ पासून वेगवेगळे कायदे,अहवाल(रिपोर्टस्),आयोग आले. दर आठ ते दहा वर्षांनी प्रत्येकवेळी वेगळे रचना,मुद्दे हे त्या-त्या कालावधीत आलेली आपणाला पहायला मिळते. आपल्याकडे आजतागत १८३५ पासून इंग्रजांनी रूढ केलेली शिक्षण पध्दत कायच आहे. अनेक रिपोर्टस्,अहवाल आले पण या शिक्षण व्यवस्थेचा आपल्या शैक्षणिक पध्दतीवर पगडा कायम असल्याचे दिसते. यावेळी रचनात्मक आणि शैक्षणिक विषयक शिक्षकांना करावे लागणारे काम, प्रमामपत्र, पदवी,पदविका,पदव्युत्तर,पीएचडी यासारख्या वर्गासांठीची रचना, समूह,संलग्न आणि एकत्रित विद्यापीठाची कार्यपध्दती,गुणांकन पध्दत या मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांनी प्रश्न विचारत आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. गायत्री जोशी यांनी सुत्रसंचालन केले. डॉ.गुगाणे यांनी परिचय करून दिला. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुभाष सावंत यांनी आभार मानले.
Mr.Anand Mahapuskar