भोंसला मिलीटरी कॉलेजमध्ये `श्री` ची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली
भोंसला मिलीटरी कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांच्याहस्ते सपत्नीक `श्री` ची विधीवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. पूजनानंतर रामदंडीच्या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाने परिसर दुमदुमुन गेला होता. सुरवातीला वसतिगृहातील रामदंडीने बनवलेल्या शाडू मातीच्या पार्थिव गणेश मूर्ती प्राचार्यांच्या निवासस्थानापासून पारंपारिक ढोल, लेझिम वाद्यांच्या निनादात महाविद्यालयात आणण्यात आली. मराठमोळ्या पारंपारिक वेशातील रामदंडीने सर्वांचेंच लक्ष वेधले. श्री भूषण देशमाने यांनी वैदिक पद्धतीने पूजा सांगितली. त्यानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्राचार्यांच्या सुचनेनुसार वसतिगृहातील रामदंडीनी आरती व अथर्वशीर्ष पठणात उत्साहात सहभाग नोंदवला. पुढील पाच दिवस नियमित पुजा,आरती विधींसह सामूहिक अथर्वशीर्ष पठण, व्यक्तिमत्व विकास, फण गेम्स यासारख्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्राचार्य डॉ नाईक व मेजर विक्रांत कावळे यांनी सर्वांना मार्गदर्शन करत गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.