ग्रीटिंग कार्ड स्पर्धा
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला सैनिकी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मंगळवार दिनांक 27/9/2023 रोजी " गौरी गणपती चे औचित्य साधून ग्रीटिंग कार्ड स्पर्धा" घेण्यात आली. या स्पर्धेसाठी "श्री गणेशाची विविध रूपे व श्लोक असा विषय देण्यात आला.होती.स्पर्धेमध्ये एकूण 31 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे ग्रीटिंग कार्ड तयार केले.
स्पर्धेचे परीक्षण कला विभाग प्रमुख सौ. मंजुषा उपासनी मॅडम यांनी केले. सदर स्पर्धेत कु प्रियंका गावित( समन्वयक ), सौ. यू. एस. कुलकर्णी ,सौ दिपाली पवार, लक्ष्मी निकुंभ यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे.एस.भावसार सर व पर्यवेक्षक मेजर व्ही. जे.कावळे सर यांचे ही सहकार्य लाभले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
"ग्रीटिंग कार्ड स्पर्धा " यशस्वीपणे संपन्न झाली.