भोसला मिलिटरी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी आठ वाजता श्रीराम मंदिरात माननीय प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांच्या हस्ते कोदंडधारी श्रीरामाच्या पूजनाने करण्यात आली. तसेच अँड सुयोग शहा सरजी व वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. पौर्णिमा उमेश झेंडे (वरिष्ठ महाविद्यालय) व प्रा. बी .एस .शुक्ला मॅडम (कनिष्ठ महाविद्यालय) यांनीही श्रीरामाचे पूजन केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. श्रीराम पूजनाचे सर्व काही संयोजन प्रा. भूषण देशमाने सरांनी केले. या कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.