जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन प्रथम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेटींतर्गत

14 Feb 2024 13:07:00
jmc_शैक्षणिक_भेट 
 
जागतिक रेडीओ दिनाचे औचित्य साधत आज भोसला मिलिटरी कॉलेजच्या जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेटींतर्गत रेड एफ ९३.५ एफएम बजाते रहो, या रेडीओ स्टेशनला भेट दिली. या भेटीत प्रसिध्द आर जे रूद्रा आणि एक्झीकेटिव्ह एडिटर अमोल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी रेडीओ स्टेशनच्या रचनेपासून तर गाण्याची रचना,एडीटिंग,मिक्सिग,ब्राँडकास्टींग,कॉलींग,मॉनिटरिंग,लाईव्ह ट्रान्मिशन यासारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारत शंकाचे निरसन करून घेतले.आरजे अंजली,सौरभ आदींनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. श्रोत्यांची संख्या जास्त असणाऱ्या कार्यक्रमांची रचना कशी केली जाते हे सांगत त्यांनी लाइव्ह शो दरम्यान आलेले भन्नाट अनुभवही शेअर केले. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ,रामाची प्रतिमा आणि धर्मवीर डॉ.मुंजेच्या सार्धशतीचे पुस्तक देत रेड एफएमचे आभार मानले.
 
Powered By Sangraha 9.0