
भोंसला सैनिकी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा . दि.७ मार्च २०२४ रोजी भोंसला सैनिकी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले ज्यामध्ये विविध कला गुण प्रदर्शन , गीत गायन, स्वरचित कविता सादरीकरण ई कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सौ. अलकनंदा पवार यांच्या शारदा स्तवनाने झाली.यावेळी प्रस्ताविक करताना राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विष्णू पवार यांनी महिला आणि पुरुष यांचे परस्परपुरकत्व मांडताना दोन्ही बाजूंनी समतोल असण्याची आणि त्याअनुषंगाने वर्तन करण्याची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त केली.या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इंग्रजी विभागप्रमुख डॉ प्रभावती जगताप यांच्या 'दिलसे दिलं तक ' या हिंदी कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयत्री आणि लेखिका डॉ. वृंदा भार्गवे उपस्थित होत्या. महिलांनी खऱ्या अर्थाने महिला म्हणून वागायला हवे आणि त्याची जाणीव सर्वांना हवी. महिला म्हणून समाजात काय वागणूक मिळते आणि महिलांचे अनेक क्षेत्रातील योगदान कसे दुर्लक्षित केल्या जाते याबद्दल खंत व्यक्त केली आणि हे कधीतरी बदलावयास हवे आणि सगळ्यांनी महिलांचे योगदान ध्यानात घ्यावयास हवे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी दुसऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक रोड महाविद्यालयातील डॉ.राजश्री नाईक उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. भार्गवे यांनी व्यक्त केलेल्या भावनेची दखल घेऊन त्याप्रमाणे भविष्यात निश्चित बदल केले जातील असे आस्वासीत केले. शक्तिनिकेतन बहुउद्देशीय संस्थेच्या महिला सदस्यांनी यावेळी एक समूह गीत आणि एक कृती गीत सादर करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. गणित विभागाच्या प्राध्यापिका सौ. रश्मी भोळे यांनी एक सुमधुर हिंदी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या महिला माता उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या महिला स्नेहा कुलकर्णी आणि सोनाली लिमये या महिलांचा मा. प्राचार्य यांच्या हस्ते विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री आंबेकर आणि सौ. शर्मिला भावसार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.गायत्री जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सागर आहेर, श्री. विक्रम शर्मा, श्री मयूर पेठकर, श्री. दत्ता निंबाळकर , अमनप्रीत कौर ई शिक्षक आणि उन्नती शेट्टी , सई, हितेश पेठे, यज्ञेष भोईर, नित्या , ईश्वरी ई नी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.