_202403161259452059_H@@IGHT_500_W@@IDTH_1084.jpeg)
आज दिनांक 13 मार्च रोजी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमास नाशिक जिल्हा कौशल्य उद्योग केंद्राच्या सहा.आयुक्त अनिशा तडवी मॅडम व गायकर सर तसेच भोसला सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक , आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉक्टर भरत गुगाणे सर ,डॉ.सुनील जोशी ,डॉ. आर पी पाटील तसेच कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटच्या हेड व कौशल्य विकास केंद्राच्या समन्वयक सौ. अलकनंदा पवार मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि महाविद्यालयाचे 200 विद्यार्थी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कौशल्य केंद्राचे नामकरण चाणक्य कौशल्य विकास केंद्र हे करण्यात आले. याद्वारे महाविद्यालयातील नव्याने येऊ घातलेल्या कौशल्य विकास केंद्रातून कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या, उद्योजकतेच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील अशी आशा माननीय उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी भोसला मिलिटरी कॉलेज चे सर्व शिक्षक व कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.