15 मार्च 2024 रोजी आपल्या महाविद्यालयातील 95 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक यांनी मुंबई येथे झालेल्या "शिव - संवाद" आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदेमध्ये सहभाग नोंदविला.

Bhonsala Military College    20-Mar-2024
Total Views |


shiv savand
 
दि. 15 मार्च 2024 रोजी आपल्या महाविद्यालयातील 95 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक यांनी मुंबई येथे झालेल्या "शिव - संवाद" आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून महाराज छत्रपती बाबाजीराजे भोसले ( तंजावर - तामिळनाडू) हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री.विकास खारगे (मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव) व श्री. विभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचलनालय, महाराष्ट्र शासन) हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठ फोर्ट परिसर येथे पार पडला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जाण्या येण्याची व्यवस्था महाविद्यालयाने केली होती.  डॉ. निलेश पवार यांनी या कामी समन्वयक म्हणून काम बघितले. सौ. मनीषा वैद्य,  कु. सोनाली लिमये, कु. प्रियंका पाटील, कु. अविनाश कौर, श्री.दत्तात्रय निंबाळकर, कु. वृंदा शेलार,  श्री ऋषिकेश शिंदे, सौ. आदिती कुलकर्णी, सौ. शिवानी परदेशी हे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.