जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी कॉम्युटर विभाग प्रमुख सौ.अलकनंदा पवार यांचे इंट्रोडंक्शन ऑफ सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यान झाले.

22 Mar 2024 12:35:13
 
MCJ Dept
 
 
 भोसला मिलिटरी कॉलेजच्या जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभागातर्फे आज महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्युटर विभाग प्रमुख सौ.अलकनंदा पवार यांचे इंट्रोडंक्शन ऑफ सायबर सिक्युरिटी या विषयावर व्याख्यान झाले. सौ. पवार यांनी आजच्या काळात सायबर सिक्युरिटीचे महत्व सांगण्याबरोबरच भविष्यातील काळजी वाढवणाऱ्या घटना विविध उदाहरण विषद केल्या. कुठल्याही प्रकारचा दैनंदिन व्यवहार करतांना कशी काळजी घ्यावी,आपली वैयक्तीक माहिती शेअर करू नये, पासवर्ड जतन कसे करावे यासारख्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. डॉ.सायली आचार्य यांनी स्वागत करत परिचय करून दिला. कर्नल रजनीस अय्यर यांनी पुष्पगुच्छ व रामाची प्रतिमा देऊन मँडमचे स्वागत केले. प्रशांत सुर्यवंशी यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0