भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये अग्निवीर जानवी शरद अहिरे आणि अग्नीवीर प्रतीक दिनेश शिंदे यांना कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉक्टर विजय प्रसाद अवस्थी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक यांनी सन्मानित केले. प्रतीक शिंदे हा महाविद्यालयातील एफ वाय बी एस सी वर्गातील तसेच एनसीसी नेव्हलिंगचा कॅडेट असून त्याचे चार महिन्यांपूर्वी इंडियन नेव्ही मध्ये अग्निवीर म्हणून सिलेक्शन झाले आणि ट्रेनिंग चिल्का ओडिसा येथे झाले आणि तो पुढील ट्रेनिंग साठी आयएनएस शिवाजी लोणावळा येथे जात आहे अग्निवीर जानवी शरद अहिरे ही महाविद्यालयातील टी वाय बीसीएस कम्प्युटर सायन्स या वर्गातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे ती महाविद्यालयातील एनसीसी आर्मी विंगची कॅडेट असून चार महिन्यांच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरती तिचा शपथविधी 15 मार्च 2024 रोजी चिल्का ओरिसा येथे पार पडला तसेच ती भारतीय नौसेनाच्या इतिहासातील पहिली महिला गार्ड संचालन करून पहिली महिला गार्ड कमांडर बनण्याचा मान मिळवला आता पुढील प्रशिक्षणासाठी ती केरळ येथील कोची येथे जाणार आहे दोघेही एनसीसी कॅडेट्सला मेजर विक्रांत कावळे आणि कॅप्टन योगेश भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले