भोसला सैनिकी महाविद्यालयातील विद्यार्थि सौरभ शिरसाठ भारतीय लष्कर सेनेत निवड. सत्काराप्रसंगी प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, प्रा. अलकनंदा पवार
----------------------------------------
कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्याची भारतीय लष्कर सेनेत निवड
नाशिक,ता. ०४ येथील भोसला सैनिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाचा सौरभ शिरसाठ (द्वितीय वर्षे बीएस्सी कॉम्प्युटर) याची भारतीय लष्कर मध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल विद्यार्थ्याचा प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. दिनेश नाईक आणि कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख प्रा. अलकनंदा पवार उपस्थित होते. या विद्यार्थ्याला मेजर विक्रांत कावळे, योगेश भदाणे यांचेही मार्गदर्शन लाभले.