महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये मुख्य परिक्षा अधिकारी प्रदीप इखणकर यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा.भिमराव पांडवे, डिफेन्स अँन्ड स्टेटेजिक विभाग प्रमुख डॉ.रमेश राऊत, प्रशासकीय कार्यालयातील महेश पवार,स्टोअरचे कैलास विसपुते, क्रीडा विभागाचे श्री.जाधव आदी उपस्थित होते. श्री.इखणकर यांनी जयंतीनिमित्त महात्मा फुलेच्या कार्याचे महत्व विषद केले.