डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.

Bhonsala Military College    17-Apr-2024
Total Views |
 
Dr.Babasaheb Ambedkar
Dr.Babasaheb Ambedkar
 
 
दि. १४/०४/२०२४ रोजी भोंसला सैनिकी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.बाबासाहेबांनी देशाप्रती केलेल्या कार्याचे व त्यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेचे महत्व सांगितले. व भारतीय राज्यघटनेची उद्देशिका पाठ करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यातून आपल्याला देशाची सेवा करण्याची प्रेरणा तसेच बाबासाहेबांना अभिवादन केल्याचेही समाधान आपणास मिळेल. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयातील कर्मचारी, तसेच वसतीगृहातील सर्व विद्यार्थी व तेथील कर्मचारी उपस्थित होते.