भोसला महाविद्यालयात SYBCom च्या विद्यार्थ्यांसाठी आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ. आर.पी. पाटील,प्रोफेसर डॉ.सुनील जोशी, सहा.प्रा.मिलिंद पाडेवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. मिलिंद पाडेवार यांनी प्रास्ताविक केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये NEP चे एकंदरीत स्ट्रक्चर समजावून दिले.
डॉ.सुनील जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाणिज्य शिक्षणामध्ये उपलब्ध असलेल्या करिअर संधी त्याचप्रमाणे विविध कोर्सेस याबद्दल सविस्तर माहिती दिली.
सहा.प्रा. ऋषिकेश झुटे यांनी विषयांचे स्ट्रक्चर समजावून सांगितले.
सहा.प्रा.साक्षी गवारे यांनी विविध क्रेडिट, परीक्षा प्रक्रिया, गुण या विषयावर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.दिनेश नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला.
कार्यक्रमासाठी इतर फॅकल्टी चे डॉ.भरत गुगाणे,प्रसन्न दीक्षित,दत्ता निंबाळकर,तसेच डॉ. वैशाली गंधे, सहा. प्रा.दीपा हिंगे,सहा. प्रा.आम्रपाली पाटील, सहा. प्रा.कृतिका सबलोक, सहा.प्रा माधुरी झाडे, किरण शेंडे व द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. भावेश्वरी साळुंखे यांनी केले तर आभार सहा. प्रा.क्रितिका सबलोक यांनी मानले.